05 August 2020

News Flash

‘आप’ने १५ विद्यमान आमदारांचे तिकीट कापले

२४ नव्या चेहऱ्यांना दिली संधी, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर

संग्रहीत

दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने सर्व ७० जागांवरील उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे ‘आप’कडून १५ विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. तर, २४ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

दिल्लीत ८ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असुन ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे पतपरगंज येथून  निवडणूक लढवत आहेत.

यंदा आम आदमी पार्टीच्यावतीने सहाच्या जागी आठ महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. २१ जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर २२ जानेवारी रोजी अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. २४ जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे. २२ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. दिल्लीमध्ये ७० विधानसभा जागा असून गेल्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने ६७ जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला होता.

दिल्लीत आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजपा अशी तिहेरी लढत पहायला मिळणार आहे. आम आदमी पक्षाकडून अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारी असणार आहेत. भाजपाने मात्र अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही. दिल्लीच्या निवडणुकीत यावेळी सुधारित नागरिक्तव कायदा आणि जेएनयू हिंसाचार दोन महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहेत. एकीकडे भाजपा आक्रमकतेने मुद्दे मांडत असताना आम आदमी पक्ष मात्र सांभाळून पावलं उचलत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 11:04 am

Web Title: aap announces list of all 70 candidates for delhi assembly election msr 87
Next Stories
1 पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भारतात येणार?
2 हॉलमार्क नसलेल्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री केल्यास एक वर्षाचा तुरुंगवास
3 भारतात होणार SCO बैठक, इम्रान खान यांना देणार निमंत्रण
Just Now!
X