06 July 2020

News Flash

‘अमित शहांना आरोपमुक्त करण्यासाठी भाजपकडून सीबीआयचा गैरवापर’

आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी भाजप सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला.

| December 27, 2014 01:55 am

आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी भाजप सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला. काँग्रेस पक्षाप्रमाणे भाजपही सीबीआय यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचे केजरीवाल यांनी आपल्या ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे. यापूर्वी स्वपक्षातील किंवा घटकपक्षातील मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा तपास कमकुवत करण्यासाठी काँग्रेसने सीबीआयचा गैरवापर केला होता. आता भाजपही  पक्षाध्यक्ष अमित शहा यांना दंगलीच्या आरोपांमधून मुक्त करण्यासाठी सीबीआयचा दुरूपयोग करत असल्याचे त्यांनी सांगितले. मग आता प्रसारमाध्यमे शांत का बसली आहेत, प्रसारमाध्यमे अमित शहांना झुकते माप देत आहेत, का त्यांना शहांचे भय वाटते, असा सवालही केजरीवालांनी यावेळी उपस्थित केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2014 1:55 am

Web Title: aap chief arvind kejriwal said that the bjp is misusing
Next Stories
1 काश्मिरात पेच कायम
2 भारतातील सर्वोत्तम शिक्षक जगभरात पोहोचले पाहिजेत
3 छोटा सिलिंडर किराणा दुकानांमध्येही उपलब्ध!
Just Now!
X