News Flash

‘आप’मधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून शाझिया इल्मींचा राजीनामा

आम आदमी पक्षाच्या नेत्या शाझिया इल्मी यांनी शनिवारी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन आपण पक्षातून राजीनामा देत असल्याची घोषणा केली. आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य असणाऱ्या शाझिया इल्मी

| May 24, 2014 11:54 am

आम आदमी पक्षाच्या नेत्या शाझिया इल्मी यांनी शनिवारी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन आपण पक्षातून राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ‘आप’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य असणाऱ्या शाझिया इल्मी यांनी ‘आप’मधील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. यावेळी शाझिया इल्मी यांनी पक्षामध्ये अंतर्गत लोकशाहीचा अभाव असल्याचे सांगत आपच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आम आदमी पक्षात खूप काही करण्याची क्षमता आहे. मात्र, पक्ष सध्या आपल्या उद्दिष्टांपासून भरकटत असल्याचे इल्मी यांनी सांगितले. भांडवलदारांच्या कंपूशाहीला आम आदमी पक्षाचा विरोध असताना पक्षात मात्र, कंपूशाहीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप करत शाझिया यांनी एकच खळबळ उडवून दिली. या विशिष्ट गटाकडून सध्या पक्षातील निर्णय घेतले जात असून या कार्यपद्धतीवर पक्षातील कुमार विश्वास यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते नाराज असल्याचे इल्मी यांनी सांगितले. केवळ आंदोलन करणे आणि जेलमध्ये जाणे हा आपचा एककलमी कार्यक्रम बनल्याची टीका त्यांनी केली.  आम आदमी पक्ष हा नेहमीच लोकशाहीचा आग्रह धरत आला आहे. मात्र, अरविंद केजरीवाल यांच्या मागे पक्षातील काही लोकांनी गटातटाचे राजकारण सुरू केले. आता हेच लोक अरविंद केजरीवाल यांची दिशाभूल करत असून  केजरीवाल यांनी वेळीच सावध होण्याची गरज असल्याचेसुद्धा इल्मी यांनी सांगितले. मात्र, याचवेळी आपल्याला पक्षात पुन्हा महत्वाची जबाबदारी दिल्यास आपण पक्षात पुन्हा येऊ असे सांगत शाझिया यांनी परतीची वाट मोकळी ठेवली आहे. 
या निर्णयानंतर बोलताना आम आदमी पक्षाचे प्रवक्ते योगेंद्र यादव यांनी शाझिया इल्मी यांचा निर्णय दुर्देवी असल्याचे सांगत त्यांनी आणखी काळ प्रतिक्षा केली पाहिजे होती असे सांगितले.  मात्र, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाच्या रचनेचा आणि विचारमंथन करण्याची वेळ आली असल्याचा शाझिया यांचा मुद्द्याशी आपण सहमत असल्याची प्रतिक्रिया योंद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 11:54 am

Web Title: aap disquiet spreads shazia ilmi may quit workers disrupt meet
टॅग : Shazia Ilmi
Next Stories
1 नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी नवाज शरीफ भारतात येणार
2 काँग्रेस नेत्यांकडून मिलिंद देवरांची कानउघाडणी!
3 नौदलाच्या ताफ्यात बोईंगचे चौथे टेहळणी विमान दाखल
Just Now!
X