स्वतंत्र तेलंगणा राज्यनिर्मितीला आम आदमी पार्टी (आप) अनुकूल असल्याचे आपचे ज्येष्ठ नेते प्रशांत भूषण यांनी शनिवारी येथे सूचित केले. सत्तेच्या विकेंद्रीकरणावर पक्षाचा विश्वास असल्याने आपचा छोटय़ा राज्यांच्या निर्मितीला पाठिंबा आहे, असेही ते म्हणाले. कोणत्याही पक्षाशी निवडणूकपूर्व युती अथवा आघाडी करण्यास आपचा विरोध असल्याचे प्रशांत भूषण यांनी स्पष्ट केले. मात्र आंध्र प्रदेशमधील लोक सत्ता यासारख्या समविचारी पक्षांचे आपमध्ये स्वागतच असल्याचे भूषण म्हणाले.