News Flash

‘आप’चे बंडखोर आमदार कपिल मिश्रा भाजपमध्ये दाखल

प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी आणि विजय गोयल यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

दिल्ली विधानसभेची सदस्यता रद्द करण्यात आल्यानंतर व अपात्र घोषित करण्यात आल्यानंतर आम आदमी पार्टीचे बंडखोर आमदार कपिल मिश्रा यांनी अगोदरच जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी भाजपात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी आणि विजय गोयल यांच्या उपस्थितीत त्यांनी भापजपाची प्राथमिक सदस्यता स्वीकारली.

कपिल मिश्रा यांनी शुक्रवारीच ट्विटद्वारे आपण उद्या भाजपात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. शिवाय ‘दिल्ली चले मोदी के साथ’ असे घोषवाक्य देखील त्यांनी ट्विमध्ये वापरले होते.

विधानसभेची सदस्यता रद्द करण्यात आल्यानंतर कपिल मिश्रा यांनी, मोदींसाठी एकदा नाही तर शंभरवेळा खुर्ची सोडण्यास तयार असल्याचे म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 9:48 pm

Web Title: aap leader kapil mishra joins bharatiya janata party msr 87
Next Stories
1 भूतानच्या विकासातील प्रमुख भागीदार असल्याचा भारताला आनंद – पंतप्रधान मोदी
2 पाकिस्तानची खुमखुमी कायम; सीमेवर सज्ज असल्याची भाषा
3 गुलाम अहमद मीर यांची नजरकैद बेकायदेशीर – पी. चिदंबरम