दिल्लीचे नायाब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत धरणे आंदोलनाला बसलेले सत्येंद्र जैन यांची प्रकृती ढासळल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली.
अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया, गोपाळ राय यांच्यासोबत सत्येंद्र जैन नायाब राज्यापालांच्या कार्यालयात मागच्या सहा दिवसांपासून धरणे आंदोलनाला बसले होते. दिल्लीच आयएएस अधिकाऱ्यांनी त्यांचा संप मागे घ्यावा या प्रमुख मागणीसाठी सत्येंद्र जैन १२ जूनपासून आमरण उपोषण करत होते. सत्येंद्र जैन दिल्लीचे आरोग्यमंत्री आहेत.
आम आदमी पक्षाने आता नायब राज्यपालांऐवजी थेट पंतप्रधानांच निशाण्यावर घेण्याची रणनीती अवलंबली आहे. आप कार्यकर्ते रविवार मंडी हाऊसपासून पंतप्रधान निवासस्थानावर मोर्चा घेऊन गेले होते. सांयकाळी चार वाजता निघालेल्या या मोर्चात खासदार संजय सिंह, दिलीप पांडे आणि पक्षाचे इतर नेते आणि कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते. दरम्यान, पंतप्रधान निवासाला घेराव घालण्यासाठी निघालेला आपचा मोर्चा पोलिसांनी संसद मार्गावरच रोखून धरला.आपने ट्विटर हँडलवरून केंद्र सरकारच्या विरोधात आरपारच्या लढाईची घोषणा करत लिहिले की, याचना नाही आता युद्धच होणार.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 18, 2018 10:03 am