आपचे नेते सोमनाथ भारती यांच्यावर त्यांच्या पत्नीने बुधवारी छळवणूक केल्याचे आरोप केले होते. मात्र गुरुवारी आणखी धक्कादायक आरोप पत्नी लिपिका यांनी केले. गर्भवती असताना माझ्यावर त्यांनी कुत्र्याला सोडले असा आरोप त्यांनी केला. तसेच तिसऱ्या वेळी आपल्याला गर्भपात करून घेण्यास भाग पाडले अशी कैफियत मांडली. दरम्यान सोमनाथ भारती यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या विरोधात दिल्लीत निदर्शने सुरु असताना  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन आपली बाजू भारती यांनी मांडली.