26 September 2020

News Flash

आपच्या आमदार अलका लांबा काँग्रेसमध्ये जाणार?; सोनिया गांधींची घेतली भेट

अनेक महिन्यांपासून त्या पक्षावर आणि पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर नाराज आहेत.

अलका लांबा

दिल्लीतील चांदणी चौक मतदारसंघातील आम आदमी पार्टीच्या (आप) आमदार अलका लांबा या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मंगळवारी त्यांनी काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा आणि युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना वेग आला आहे. अनेक महिन्यांपासून त्या पक्षावर आणि पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर नाराज आहेत.

पुढच्या वर्षी २०२० मध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. २०१५ मध्ये जबरदस्त यश मिळवल्यानंतर आम आदमी पार्टी पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरी जाणार आहे. दरम्यान, ऑगस्टमध्ये अलका लांबा यांनी आपण पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे घोषित केले होते. तसेच आगामी निवडणूक ही अपक्ष म्हणून लढवणार असल्याचे म्हटले होते. यावर पक्षानेही त्यांचा राजीनामा स्विकारण्यास तयार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही.

लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा पराभव झाल्याने पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावरील जनतेचा विश्वास कमी झाल्याचे लांबा यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांना पक्षाच्या सभासदांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकण्यात आले होते.

दरम्यान, नाराज असल्याने लांबा यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासही नकार दिला होता. एप्रिल महिन्यांत अलका लांबा आणि आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांच्यासोबत ट्विटरवरुन खडागंजी झाली होती. यावेळी भारद्वाज यांनी लांबा यांना टोमणे मारत पक्षाचा राजीनामा देण्यास सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2019 1:49 pm

Web Title: aap mla alka lamba likely to join congress visited congress interim chief sonia gandhi aau 85
Next Stories
1 अवघ्या चार सेकंदाचं ऑपरेशन, विक्रम लँडरपासून चंद्र काही पावलं दूर
2 बीफवरुन जर्मनीत केरळी-उत्तर भारतीय आमनेसामने; पोलीस म्हणाले हा भारत नाही
3 मिनिटाला ६२५ गोळ्या झाडणारी गन, नजरेच्या इशाऱ्यावर चालणारी शस्त्रे; जाणून घ्या ‘अपाचे’बद्दल
Just Now!
X