‘आप’चे आमदार अखिलेश त्रिपाठी यांची न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल गुरुवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. त्यांच्याविरोधात दंगलीत सहभागी झाल्याच्या आरोपाखाली खटला सुरू आहे.
या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झाला होता; परंतु वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही त्रिपाठी न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या न्यायालयाने ९ ऑक्टोबर रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी केले. महानगर दंडाधिकारी कपिल कुमार यांनी यासंदर्भात आदेश जारी केला. त्रिपाठी यांना न्यायालयीन प्रक्रियेत जाणूनबुजून विलंब करावयाचा आहे. त्यांना न्यायालयाबद्दल आदर नाही. तसेच, त्यांना या खटल्यात सहकार्यही करावयाचे नाही.