News Flash

अंबानींसोबतचे संबंध उघड न केल्यामुळे ‘आप’ची पुन्हा ‘जंग’

दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यावर विविध कारणांवरून टीका करणाऱ्या आम आदमी पक्षाने आता पुन्हा एकदा त्यांच्याविरुद्ध आघाडी उघडली आह़े

| February 14, 2014 02:47 am

दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यावर विविध कारणांवरून टीका करणाऱ्या आम आदमी पक्षाने आता पुन्हा एकदा त्यांच्याविरुद्ध आघाडी उघडली आह़े  रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासोबतचे संबंध उघड न केल्याबद्दल ‘आप’ने पुन्हा जंग यांना लक्ष्य केले आह़े
जंग यांच्यावर रिलायन्स गॅस प्रकरणावरून टीकेची झोड उठवीत ‘आप’चे प्रवक्ते आशुतोष यांनी केलेल्या ट्विप्पणीत म्हटले की, पूर्वी जंग यांनी अंबानी यांच्यासोबत लंडन आणि भारतातही काही काळ काम केले आह़े  ते रिलायन्सच्या ‘विचार मंच’चे भाग होत़े  हे वास्तव त्यांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक होत़े  गेल्या आठवडय़ापासून ‘आप’ने जंग यांना तिसऱ्यांदा लक्ष्य केले आह़े
मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी वृत्तसंस्थेला गेल्या आठवडय़ात दिलेल्या मुलाखतीत जंग यांना ‘काँग्रेसचे हस्तक’ म्हणणे अयोग्य असल्याचे म्हटले होत़े  पक्षाच्या नेत्यांनी बोलताना काळजी घ्यायला हवी असेही त्यांनी म्हटले होत़े
आशुतोष यांनी त्यांच्या ट्विप्पणीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनाही रिलायन्स गॅस प्रकरणात मौन बाळगल्याबाबत लक्ष्य केल़े

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 2:47 am

Web Title: aap slams delhi lg for not disclosing association with ambani
Next Stories
1 कट्टरतावादाचे आरोप संघाची प्रतिमा मलिन करण्यासाठीच -राम माधव
2 मुंबईतील मनीष मार्केट आणि लॅमिंग्टन रोड पायरसीसाठी ‘जगद्कुख्यात’
3 सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त विशेष डूडल
Just Now!
X