News Flash

दिल्लीत मोहल्ला क्लिनिक उभारण्यात विलंब

सरकारी जागा उपलब्ध होणार

| October 10, 2016 01:17 am

loksatta, marathi news paper, news paper, news online, marathi news, marathi news online, newspaper, news, latest news in marathi, current news in marathi,sport news in marathi, bollywood news in marathi
अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांची माहिती; सरकारी जागा उपलब्ध होणार

दिल्लीत एक हजार मोहल्ला क्लिनिकचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणखी दोन ते चार महिने विलंब लागेल, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

मोहल्ला क्लिनिकची काही ठिकाणी विनापरवाना बांधकामे करण्यात आली आहेत. ती हटवण्याचा निर्णय दिल्ली महापालिकेने घेतला होता. त्यावरून वाद झाला होता. त्यातून आता मार्ग निघाला आहे. त्यामुळे डिसेंबरअखेरीस मोहल्ला क्लिनिकचे उद्दिष्ट पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी सरकारी जमीन वापरण्यास नायब राज्यपालांनी तत्त्वत: मान्यता दिल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. उत्तर दिल्ली  महापालिकेने रस्त्याच्या कडेला बांधलेली काही क्लिनिक पाडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. गेली तीन महिने यावरून राज्य सरकार व महापालिकांमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यातच आरोग्य सचिवांचीही बदली करण्यात आल्याची तक्रार केजरीवाल यांनी केली.  मोहल्ला क्लिनिक ही आप सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. याखेरीज १०५ अशा सुविधा आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर याबाबत बैठक झाल्याने समाधान असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. कामगारांना वैद्यकीय सुविधा पुरवता यावी यासाठी दिल्ली तील काही प्रमुख व्यापारी केंद्रांच्या ठिकाणी अशी क्लिनिक उभारली जाणार आहेत. याखेरीज विद्यार्थ्यांसाठी ३०० शाळांमध्येही ही सुविधा पुरवली जाणार आहे. याशिवाय १०० पॉलीक्लिनिक उभारण्याची दिल्ली सरकारची योजना आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2016 1:17 am

Web Title: aap unveils citys first mohalla clinic
Next Stories
1 यंदाची विजयादशमी देशासाठी विशेष
2 इंदिरा गांधी विमानतळावर किरणोत्सर्जक पदार्थाची गळती?
3 यूएस ओपन : एका न-नायकाचं वस्त्रहरण!
Just Now!
X