नेत्यांचे राजीनामासत्र, चहूबाजूंनी पक्षनेतृत्वावर होणारी टीका आणि लोकसभा निवडणुकीतील असमाधानकारक कामगिरी यानंतर आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी पक्षात आमूलाग्र बदल करण्याचे जाहीर केले.  त्याचवेळी ‘मीही माणूस आहे. त्यामुळे माझ्याकडूनही चुका होऊ शकतात,’ असे सांगून पक्षातील नाराजांच्या मनधरणीचेही प्रयत्न केले.
अग्रलेख
अडेल अरविंदचे आव्हान 
‘आप’च्या तीन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या शेवटच्या सत्रात बोलताना केजरीवाल यांनी ‘मिशन विस्तार’ची घोषणा केली. या अंतर्गत पक्षातील सर्व समित्यांवर फेरनियुक्त्या करण्यात येतील व येत्या वर्षभरात नवीन लोकांचा त्यात समावेश करण्यात येईल, असे ते म्हणाले. आपमधील मतभेद हे ‘लोकशाही’ पक्षासाठी सामान्य बाब आहे. मात्र, ‘आप’ आता आणखी मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  
 पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देणाऱ्या योगेंद्र यादव यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही केजरीवाल यांनी केला. ‘यादव हे माझ्या मोठय़ा भावासारखे असल्याने मला खडसावण्याचा त्यांना अधिकार आहे. मीदेखील माणूस असून माझ्याकडूनही चुका होतात. त्यामुळे त्यांचा सल्ला मी गांभीर्याने घेतो,’ असे ते म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभा लढणार?
महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन राज्यांमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये ‘आप’चे उमेदवार उभे करायचे का किंवा किती जागा लढवायच्या याबाबतचा निर्णय पक्षातील वरिष्ठ विचारमंथन करूनच घेतील, असेही केजरीवाल म्हणाले.