आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांच्यासह ४० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अमेठीतील प्रचार संपल्यानंतर मतदार संघातील बिगर-नोंदणीकृत मतदार आणि उमेदवाराच्या समर्थकांना जिल्हा सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, ‘आप’चे उमेदवार कुमार विश्वास यांच्या समर्थकांनी अमेठी सोडून जाण्यास नकार दिला. तसेच पत्नी, आई आणि नातेवाईकांना अमेठी सोडून जाण्यास  जिल्हा प्रशासनाकडून धमकाविल्याचा आरोप कुमार विश्वास यांनी केला होता.
मात्र, आचार संहितेच्या नियमांनुसार मतदान होईपर्यंत बिगर-नोंदणीकृत मतदार आणि उमेदवार समर्थकांना जिल्ह्या सोडावा लागेल यानुसारच लागेल यानुसारच आम्ही विश्वास यांच्या नातेवाईक तसेच कार्यकर्त्यांना अमेठी सोडण्यास सांगितले असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हटले.