News Flash

आरुषी हत्याकांड प्रकरण : तलवार दाम्पत्याच्या मुक्ततेविरोधात हेमराजच्या पत्नीची सुप्रीम कोर्टात धाव

आलाहाबाद हायकोर्टाने केली होती निर्दोष मुक्तता

(छायाचित्र सौजन्य- एएनआय)

बहुचर्चित आरुषी-हेमराज हत्याकांडप्रकरणी डॉ. नुपूर आणि राजेश तलवार यांची आलाहाबाद हायकोर्टाने १२ ऑक्टोबर २०१७ रोजी निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर हे प्रकरण संपले असे वाटत असताना आता त्याचा पुढचा अंक सुरु होण्याची शक्यता आहे. कारण मृत हेमराजच्या पत्नीने हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.

मे २००८ मध्ये तलवार दाम्पत्याच्या नोयडा येथील घरामध्ये त्यांची एकुलती एक मुलगी आरुषी तिच्या खोलीमध्ये मृतावस्थेत आढळली होती. गळा चिरुन तिची हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे त्यांच्या घरातील नोकर ४५ वर्षीय हेमराज याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, दुसऱ्या दिवसापासून तो बेपत्त झाला होता. त्यानंतर तलवार दाम्पत्याच्या घरातील छतावर हेमराजचाही मृतदेह आढळून आला होता.

याप्रकरणी चौकशी करणाऱ्या सीबीआयने तलवार दाम्पत्यावर आरुषी आणि हेमराजच्या हत्येचा ठपका ठेवला होता. आरुषीची हत्या झाली त्या दिवशी तलवार पती-पत्नी घरातच होते. त्यांनीच आधी आपली मुलगी आरुषी हिची हत्या केली, त्यानंतर नोकर हेमराज याचीही हत्या केल्याचा दावा सीबीआयने केला होता.

सीबीआयच्या या दाव्यानुसार सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर तलवार दाम्पत्याची तुरुंगात रवानगी झाली. मात्र, सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाला तलवार दाम्पत्याने अलाहाबाद हायकोर्टात आव्हान दिले होते. त्यानंतर हायकोर्टात सुनावणीनंतर तलवार दाम्पत्य या प्रकरणात निर्दोष असल्याचा निकाल हायकोर्टाने दिला होता. त्यानंतर चार वर्षांनंतर डेन्टिस्ट असलेल्या तलवार दाम्पत्याची तुरुंगातून सुटका झाली. मात्र, आरुषी आणि हेमराज यांची हत्या नेमकी कोणी केली हा प्रश्न अद्याप अनुत्तरित राहिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 7:43 pm

Web Title: aarushi case hemrajs wife moves supreme court against talwar couples acquittal
Next Stories
1 शरद यादव यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द होणार
2 सभागृहात ‘आय बेग’ शब्द वापरू नका; आपला देश स्वतंत्र आहे- व्यंकय्या नायडू
3 काँग्रेसला सुप्रीम कोर्टाकडून झटका; इव्हीएम छेडछाड वादावरील याचिका फेटाळली
Just Now!
X