आरुषी हत्याकांडातील प्रमुख आरोपी असलेले तिचे वडील राजेश आणि आई नूपुर तलवार यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सत्र न्यायालयात नोंदविलेल्या १४ साक्षीदारांचे जबाब पुन्हा घेण्याची त्यांची याचिका न्यायालयाने मान्य केली आहे. तलवार दाम्पत्यावर त्यांचा नोकर हेमराजच्या हत्येचाही आरोप आहे.
मुख्य न्यायमूर्ती अल्तमस कबीर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (ता. १०) या याचिकेवर सुनावणी होणार आहे. तलवार दाम्पत्यानी सत्र न्यायालयात विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळलेल्या याचिकेविरोधात दाद मागितली होती. यात १४ साक्षीदारांचा जबाब पुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली होती. यात अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) आणि सीबीआयचे सहसंचालक अरुण कुमार यांचा जबाब नोंदविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र सत्र न्यायालयाने त्यांची ही याचिका ६ मेला फेटाळली होती.