आरुषी आणि हेमराज हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी राजेश आणि नुपूर तलवार यांची याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. सीबीआयच्या विशेष न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याबद्दल न्यायालयाने तलवार दाम्पत्याला फटकारले. 
आरुषी आणि हेमराज हत्येप्रकरणातील १४ साक्षीदारांना समन्स पाठवून त्यांना पुन्हा साक्ष देण्यासाठी बोलवावे, अशी मागणी याचिकेद्वारे तलवार दाम्पत्यांने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा आदेश दिला.
न्या. बी. एस. चौहान आणि न्या. दीपक मिश्रा यांच्या खडपीठामध्ये याप्रकरणी सुनावणी झाली. या स्वरुपाच्या खटल्यांना आम्ही थेटपणे हात लावत नाही. तुम्ही अशा पद्धतीने थेट सर्वोच्च न्यायालयात येणे चुकीचे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.