03 March 2021

News Flash

मोदींचा ‘जुडवा’ करणार काँग्रेसचा प्रचार

मोदी सरकार २०१४ च्या निवडणुकीत दिलेली आश्वसने पाळण्यात अपयशी ठरले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जुडवा असणारे अभिनंदन पाठक आता काँग्रेसचा प्रचार करणार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत अभिनंदन पाठक यांनी भाजपाचा प्रचार केला होता. पण भाजपावर नाराज असलेले अभिनंदन पाठक २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे वृत्त आहे.

अभिनंदन पाठक यांनी लखनऊमध्ये काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन काँग्रेसमध्ये करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष राज बब्बर यांच्याशी पाठक यांनी यावर चर्चा केली आहे. एका काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाठक यांना माझ्या खात्यात १५ लाख कधी येणार? असा प्रश्न विचारला. त्यावर पाठक म्हणाले की, ‘याच प्रश्नामुळे मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाविरोधात प्रचार करण्याचे मी ठरवले आहे.’

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहता आहे. भेटल्यानंतर त्यांनी माझी गळाभेट घेतली होती. पण मोदी सरकार २०१४ च्या निवडणुकीत दिलेली आश्वसने पाळण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे मी आता आगामी निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार आहे.

‘मी काँग्रेसचा प्रचार करण्यास तयार आहेत. पण सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी काँग्रसमधील स्थान काय असणार हे सांगावे,’ असे पाठक म्हणाले. पाठक भाजपावर नारज असले तरी मोदींच्या प्रति त्यांच्या मनात आदार आहे. अभिनंदन पाठक यांनी १९९९मध्ये लोकसभा आणि २०१२ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 6:30 pm

Web Title: abhindan pathak will campaign for congress
Next Stories
1 …म्हणून कोट्यवधी किंमतीच्या हस्तीदंतांची केली राखरांगोळी
2 क्रूजवर पिकनीकसाठी गेलेल्या 1300 भारतीयांनी कापलं देशाचं नाक, परदेशी म्हणाले हे लज्जास्पद
3 जुलैपासून बेपत्ता असलेल्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रीला ९५१ कोटींचा दंड
Just Now!
X