News Flash

२५० भारतीय विद्यार्थी अडकले मृत्यूच्या दाढेत, चीनमधील ‘कोरोना व्हायरस’च्या शहरातून बाहेर पडता येईना

एकाच शहरात आतापर्यंत ४६ जणांचा व्हायरसमुळे जीव गेला आहे.

चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या आणि आतापर्यंत ५६ जणांचा बळी घेतलेल्या कोरोना व्हायरसमुळे भारताची चिंता वाढली आहे. कोरोना व्हायरसचं जिथं केंद्र मानलं जातंय त्या शहरात २५० भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. मृत्यूच्या या दाढेतून त्यांची सुटका करावी, यासाठी आता भारत सरकारने चीन सरकारकडे विनंती केली आहे.

कोरोना व्हायरसचा जिथे सर्वाधिक प्रभाव आहे, अशा १७ शहरांमध्ये येण्या-जाण्यासाठी बंदी घातली आहे. या शहरांशी कोणीही संपर्क करू नये यासाठी त्या शहरांवर बंदी घालण्यात आली आहे. यातील वुहान नावाच्या शहरात ७०० भारतीय विद्यार्थी शिकतात. हेच शहर कोरोना व्हायरसचे केंद्रबिंदू आहे. या शहरात आतापर्यंत ४६ जणांचा कोरोना व्हायरसमुळे जीव गेला आहे. ७०० विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी सुटीमुळे भारतात आले. मात्र तेथे अद्याप २५० विद्यार्थी अडकलेले आहेत. या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करावी आणि त्यांना भारतात परत येऊ द्यावे, अशी मागणी भारताने चीनच्या परराष्ट्र खात्याकडे केली आहे.

कुटुंबीयांना काळजी, आमच्या मुलांचं काय होणार?
वुहान शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आता आपल्या मुलांबाबत चिंता वाटू लागली आहे. कारण संपूर्ण चीनमध्ये आणि खासकरून वुहान शहरात कोरोना व्हायरस वेगाने पसरू लागला आहे. वुहान विद्यापिठात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या पालकाने सांगितले की, ”तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांकडील खाण्या-पिण्याचे साहित्य संपत आले आहे. तेथील वाहतूक बंद आहे. तेथील दुकानं बंद आहेत. विद्यार्थ्यांना बाहेर पडण्यासही बंदी घालण्यात आली आहे. जेव्हा विद्यार्थी बाहेर पडण्याच्या तयारीत होते, तेव्हाच तेथे बंदी घालण्यात आली.”

भारतीय दुतावासाचे लक्ष
चीनमधील भारतीयांच्या आरोग्यावर तेथील भारतीय दुतावासाचे लक्ष आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2020 3:38 pm

Web Title: about 250 indian students stuck in wuhan china coronavirus outbreak pkd 81
Next Stories
1 कमळाला मतदान केलं, तर शाहीन बागमध्ये आंदोलन करणारे घरी निघून जातील -शाह
2 राजपथावरील संचलनात पहिल्यांदाच घडल्या ‘या’ पाच गोष्टी
3 देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह; राजपथावर घडले संस्कृती, सामर्थ्याचे दर्शन
Just Now!
X