30 September 2020

News Flash

अमेरिकन सैन्याकडून बगदादीच्या उत्तराधिकाऱ्याचाही खात्मा – डोनाल्ड ट्रम्प

आयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबु बक्र-अल-बगदादी याचा दोनच दिवसांपूर्वी अमेरिकन सैन्याने खात्मा केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प

आयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबु बक्र-अल-बगदादी याचा दोनच दिवसांपूर्वी अमेरिकन सैन्याने खात्मा केला. त्यानंतर आता त्याचा उत्तराधिकारी मानल्या जाणाऱ्या दहशतवाद्यालाही अमेरिकन सैन्याने ठार केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची माहिती दिली. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिले आहे.


ट्रम्प यांनी म्हटले की, “आत्ताच याची पुष्टी झाली आहे की, अबु बक्र-अल-बगदादीचा क्रमांक एकचा उत्तराधिकारी मानल्या जाणाऱ्या दहशतवाद्याचाही अमेरिकन सैन्याच्या तुकडीने खात्मा केला आहे. बगदादीनंतर तोच त्याची जागा चालवणार होता मात्र आता तो ही ठार झाला आहे.”

मात्र, ठार झालेला बगदादीचा हा उत्तराधिकारी नक्की कोण होता याचे स्पष्टीकरण ट्रम्प यांनी दिलेले नाही. दरम्यान, आयसिसचा प्रवक्ता आणि या जिहादी संघटनेचा टॉप रँकचा दहशतवादी अबु अल-हसन अल-मुहाजीर ठार झाला असल्याचे अमेरिकेने सोमवारी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 7:36 pm

Web Title: abu bakr al baghdadis number one replacement has been terminated by american troops says us pres donald trump aau 85
Next Stories
1 आर्थिक मंदीवरुन काँग्रेस सरकारला घेरण्याच्या तयारीत; आंदोलनांद्वारे देशभरात रान पेटवणार
2 ‘अलिबाबा’प्रमाणे वर्चस्वाची अंबानींची तयारी, 1.6 लाख कोटींची योजना तयार
3 युरोपियन युनियन प्रतिनिधीमंडळाच्या काश्मीर दौऱ्यावरुन विरोधकांची सरकारवर टीका
Just Now!
X