बनावट पारपत्र बाळगल्याप्रकरणी कुख्यात ‘गँगस्टार’ अबू सालेम याला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या प्रकरणांसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष सत्र न्यायालयाच्या न्या. एम. व्ही. रामण्णा नायडू यांनी गुरुवारी हे आदेश दिले.
आंध्र प्रदेश येथील कुर्नील जिल्ह्य़ातून खोटय़ा नाव आणि पत्त्याच्या आधारे, अबू सालेम याने बनावट पारपत्र तयार केले होते. या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर सात वर्षांच्या कारावासाबरोबरच, त्याला प्रत्येक आरोपासाठी एक हजार रुपये असा आर्थिक दंडही ठोठावण्यात आला. फसवणूक, दिशाभूल करणे, बनावट कागदपत्र तयार करणे, अशा सात विविध गुन्ह्यांसाठी सालेमला प्रत्येकी एक हजार रुपये दंड आणि प्रत्येकी एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली गेली.
सालेम याने स्वत:साठी, आपली पत्नी समीरा झुमानी हिच्यासाठी आणि आपली प्रेयसी मोनिका बेदी हिच्यासाठी अशी एकूण तीन बनावट पारपत्रे तयार करून घेतली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2013 12:16 pm