26 September 2020

News Flash

आर्थिक मंदी मान्य करा, हेडलाईन मॅनेजमेंट पुरे झालं- प्रियंका गांधी

नव्या अर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत आर्थिक वाढीचा दर (जीडीचा) हा ५ टक्क्यांवर आला आहे. जो गेल्या साडेसहा वर्षांतील निचांकी पातळीवर पोहोचला आहे.

संग्रहित छायाचित्र

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांनी आर्थिक मंदीवरुन केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक मंदी असल्याचे सरकारने मान्य करायला हवे असे, त्यांनी म्हटले आहे. ट्विटद्वारे त्यांनी मंदीबाबत भाष्य केले आहे.

प्रियंका म्हणाल्या, “कोणतंही खोटं शंभरवेळा सांगितल्याने ते खरं होत नाही. भाजपा सरकारला आता हे मान्य करायला हवे की, अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक मंदी असून त्यावर मात करण्यासाठी आवश्यक उपायांवर काम करणे गरजेचे आहे. मंदीचे परिणाम सर्वांसमोर आहेत, त्यामुळे सरकार कधीपर्यंत हेडलाइन मॅनेजमेंटने काम चालवणार आहे.”

दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यापूर्वीच आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण होणार असल्याचे भाकित केले होते. याला त्यांनी ‘मॅन मेड क्रायसिस’ असे म्हटले होते. याला त्यांनी नोटाबंदी आणि जीएसटीची घाईगडबडीत केलेली अंमलबजावणीच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

नव्या अर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत आर्थिक वाढीचा दर (जीडीचा) हा ५ टक्क्यांवर आला आहे. जो गेल्या साडेसहा वर्षांतील सर्वाधिक निचांकी पातळीवर पोहोचला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2019 2:23 pm

Web Title: accept the economic downturn how long will headline management do priyanka gandhi ruled the govt aau 85
Next Stories
1 काश्मीरसंबंधी इम्रान खान सरकारकडे सबळ पुरावेच नाहीत, ICJ कोर्टातील पाकिस्तानी वकिलाची कबुली
2 आपच्या आमदार अलका लांबा काँग्रेसमध्ये जाणार?; सोनिया गांधींची घेतली भेट
3 अवघ्या चार सेकंदाचं ऑपरेशन, विक्रम लँडरपासून चंद्र काही पावलं दूर
Just Now!
X