News Flash

गुजरातमध्ये रिक्षा आणि ट्रकमध्ये भीषण धडक; ५ जण जागीच ठार

गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील महुधा-कथलाल मार्गावर शुक्रवारी सकाळी हा अपघात घडला. या मार्गावर एक ट्रक भरधाव वेगाने निघाला होता.

नो एन्ट्रीतून समोरुन भरधाव वेगाने निघालेल्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात एका रिक्षाला जोरदार धडक दिली.

एका भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने प्रवाशी घेऊन जात असलेल्या एका रिक्षाला जोरदर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात रिक्षातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातच्या खेडा जिल्ह्यात शुक्रवारी हा प्रकार घडला.


पोलिसांच्या माहितीनुसार, गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील महुधा-कथलाल मार्गावर शुक्रवारी सकाळी हा अपघात घडला. या मार्गावर एक ट्रक भरधाव वेगाने निघाला होता. दरम्यान, चार प्रवाशी आणि वाहकासह पाच जण एका रिक्षातून त्याच मार्गावरुन निघाले होते. उलट्या दिशेने येणाऱ्या ट्रकने या रिक्षाला जोरदार टक्कर दिली. ही टक्कर इतकी जबरदस्त होती की, या अपघातात रिक्षाचा अक्षरशःचक्का चूर झाला असून यातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.

फारुख चौहान (रिक्षा चालक), नजीर चौहान, इरशाद चौहान, सलीम भथियारा आणि यासीन भथियारा अशी रिक्षातील मृत व्यक्तींची नावे आहेत. हे सर्वजण खेडा जिल्ह्यातल्या महुधा वस्तीजवळच्या एका गावचे रहिवासी होते. ट्रक चालकाने माहामार्गावरील इतर वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रिक्षाला जोरदार धडक दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 6:15 am

Web Title: accident happened between rickshaw and truck in gujarat 5 people killed on the spot
Next Stories
1 मनमोहन सिंग सरकारच्या काळात भारताने राखला १०.०८ टक्के विकास दर
2 वाजपेयी असामान्य मुत्सद्दी नेते : पुतिन
3 वाजपेयी व त्यांचे वडील कानपूरच्या कॉलेजात सहाध्यायी
Just Now!
X