News Flash

बिहारमध्ये अपघात; २५ ठार

औरंगाबाद जिल्ह्य़ात तितई बिघाजवळ गुरुवारी पहाटे वेगाने जाणारा एक ट्रक उलटून रस्त्यालगतच्या खड्डय़ात पडल्याने झालेल्या अपघातात ११ मुलांसह २५ जण ठार झाले. या अपघातात अन्य

| January 11, 2013 04:55 am

औरंगाबाद जिल्ह्य़ात तितई बिघाजवळ गुरुवारी पहाटे वेगाने जाणारा एक ट्रक उलटून रस्त्यालगतच्या खड्डय़ात पडल्याने झालेल्या अपघातात ११ मुलांसह २५ जण ठार झाले. या अपघातात अन्य १० जण जखमी झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
जिल्ह्य़ाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण कुमार घटनास्थळाहून पीटीआयशी बोलताना म्हणाले की, या ट्रकचा चालक दारूच्या नशेत होता व अपघातानंतर त्याच्या सहकाऱ्यासह तो पळून गेला. अपघातात जखमी झालेल्या एका इसमाने ही माहिती आपणास दिली.
या ट्रकमधून एकूण ३५ जण प्रवास करीत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2013 4:55 am

Web Title: accident in bihar 25 dead
Next Stories
1 जवानाच्या मृतदेहात नक्षलवाद्यांनी स्फोटके पेरली
2 बलात्कार प्रकरण वेगाने सोडविण्यात राजस्थानचा आदर्श
3 लक्षावधी डॉलर्स गुप्त खात्यात दडविल्याची भारतीय-अमेरिकी उद्योजकाची कबुली
Just Now!
X