26 February 2021

News Flash

दुर्दैव ! दोन ट्रकमध्ये चिरडून कारचा अपघात, एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू

'ट्रेलरने धडक दिल्यानंतर त्याचवळी मागून येणाऱ्या ट्रकनेही कारला ठोकलं'

प्रतिकात्मक छायाचित्र

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी भचाऊ येथे हा अपघात झाला. कुटुंबातील सर्व सदस्य एसयूव्ही कारमधून प्रवास करत होते. यावेळी त्यांची कार दोन ट्रकच्या मधे आल्याने चिरडली गेली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भचाऊ येथील महामार्गावर हा अपघात झाला. मीठाने भरलेल्या ट्रेलरने दुभाजक ओलांडला आणि चालक चुकीच्या दिशेने ट्रेलर नेऊ लागला. त्याचवेळी एसयूव्ही कारला त्याने धडक दिली. कारमधून एकूण 11 जण प्रवास करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

ट्रेलरने धडक दिल्यानंतर त्याचवळी मागून येणाऱ्या ट्रकनेही कारला ठोकलं ज्यामध्ये 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व पीडित भचाऊ येथून गुजरातमधील आपल्या घरी भूज येथे चालले होते तेव्हा हा दुर्दैवी अपघात झाला. मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी जिल्हा प्रशासनाला पीडितांसाठी शक्य ती सर्व मदत करण्याचा आदेश दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 10:46 am

Web Title: accident killed 10 people of family in gujarat
Next Stories
1 कर्नाटकात सर्व काही ठीक नाही, देवेगौडांना आघाडीबाबत चिंता
2 2017-18 मध्ये आर्थिक घोटाळेबाजांनी लुटले बँकांचे 41 हजार 167 कोटी रुपये
3 बांगलादेश: शेख हसीना यांच्या पक्षाचा मोठा विजय, चौथ्यांदा पंतप्रधान होणार
Just Now!
X