07 April 2020

News Flash

बलात्कार केल्यानंतर जिवंत जाळलं, जळत असताना पीडितेने मिठी मारल्याने आरोपीचा मृत्यू

आगीत होरपळून पीडित महिलेच्या हाताला आणि चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत

प्रतिकात्मक छायाचित्र

बलात्कार पीडित महिलेने जळत असताना मिठी मारल्याने 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना पश्चिम बंगाल येथील मालदा येथे घडली आहे. मृत व्यक्तीवर महिलेवर बलात्कार केल्याच आरोप होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आगीत होरपळून पीडित महिलेच्या हाताला आणि चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. तिच्यावर मालदा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत. तर संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

संबंधित व्यक्ती आपल्याला वारंवार त्रास देत असा महिलेचा आरोप आहे. सोमवारी आपण घरी एकटे असताना आरोपी आपल्या घरात घुसला होता असंही महिलेने पोलिसांना सांगितलं आहे. महिला विधवा असून आरोपीने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पीडित महिला संघर्ष करत असल्याने आरोपीने तिला जिवंत जाळलं असं पोलिसांनी सांगितलं आहे.

घरातून धूर येत असल्याचं दिसताच शेजाऱ्यांनी धाव घेतली दिसता दोघे जळत असल्याचं दिसलं. पोलिसांना घरात केरोसीन सापडलं आहे. शेजाऱ्यांनी दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलं. तिथे त्यांना मालदा मेडिलक कॉलेजमध्ये घेऊन जाण्यास सांगण्यात आलं. उपचारादरम्यान व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

महिला आपल्या दोन मुलींसोबत सुभाष कॉलनीत राहते. आरोपी इतक्या दूर घरापासून 35 किमी लांब का आला होता याचा तपास केला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपी नेहमी महिलेच्या घरी येत असे अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे. पोलीस सध्या सर्व बाजूंचा विचार करत तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2019 11:06 am

Web Title: accused died after woman he raped and sets on fire grabs him
Next Stories
1 आश्चर्यकारक : डासांनी केलं जेट एअरवेजचं विमान एक तास लेट
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 पुलवामातील हल्ल्याला भारताला अस्थिर करू पाहणाऱ्या देशाचे पाठबळ: नौदल प्रमुख
Just Now!
X