News Flash

घोड्याचं इंजेक्शन देऊन ३ वेळेस केला बलात्कार, माजी मंत्र्याच्या नोकराचा खळबळजनक खुलासा

सकाळी ११ च्या सुमारास मुलगी आपल्या वडिलांकडे छत्री घेऊन जात होती

(संग्रहित छायाचित्र)

हरियाणाचे माजी मंत्री निर्मल सिंह यांच्या फार्म हाउसवर एका ६ वर्षांच्या चिमुकलीसोबत बलात्कार आणि हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीने खळबळजनक खुलासे केले आहेत. घोड्यावर उपचार करण्याआधी दिलं जाणारं नशेचं इंजेक्शन त्याने मुलीला दिलं होतं. त्यानंतर स्वतः दारू पिऊन त्याने तिच्यासोबत बलात्कार केला आणि नंतर तिचा गळा कापून खून केला.

यमुनानगरचे पोलिस अधिक्षक राजेश कालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या जैसलमेर येथील रहिवासी असलेला आरोपी देवी हा गेल्या ११ वर्षांपासून निर्मल सिंह यांच्या फार्म हाउसवर काम करतो. मुलीसोबत तीनवेळेस दुष्कर्म केल्याचं त्याने पोलिसांसमोर कबूल केलं. दिलेल्या इंजेक्शनमुळे मुलीचा मृत्यू झाला असावा असा त्याचा अंदाज होता, पण मुलीला थोडी शुद्ध येताना पाहून त्याने चाकूच्या सहाय्याने मुलीचा गळा कापला आणि तिचा खून केला. त्यानंतर तो घाबरला. मुलीचा खून झाल्यामुळे पोलिस आता फार्महाउसवर काम करणाऱ्या सर्वांचीच चौकशी करतील म्हणून त्याने स्वतःला इजा पोहोचवली आणि तो रुग्णालयात भरती झाला. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. अखेर बुधवारी पोलिसांनी त्याला अटक केली.

काय होती घटना –
फार्म हाउसवर नोकर म्हणून काम करणारा आरोपी देवी हा आजारी घोड्यांच्या उपचारावेळी डॉक्टरांची मदत करायचा. उपचाराआधी घोड्यांना नशेचं इंजेक्शन दिलं जातं. २ जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास मुलगी आपल्या वडिलांकडे छत्री घेऊन जात होती. त्यावेळी रस्त्यात देवीने तिला पाहिलं, त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. मी तुला वडिलांकडे घेऊन जातो असं सांगून त्याने मुलीला फार्म हाउसवर घेऊन गेला. त्यानंतर त्याने मुलीसोबत बलात्कार आणि तिचा खून केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 12:38 pm

Web Title: accused revealed in interrogation that he gave sedative to 6 years old and raped trice in haryana
Next Stories
1 जो सन्मान दलाई लामांना तो शंकराचार्यांना नाही: शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती
2 घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांचा सैन्याच्या गस्तीपथकावर हल्ला; ४ जवान जखमी
3 पेट्रोल ९ तर डिझेलच्या दरात ७ पैशांची कपात
Just Now!
X