News Flash

‘अच्छे दिन’ संकल्पना सत्यात उतरविणे कठिण : नितीन गडकरी

आपला देश अतृप्त आत्मांचा महासागर आहे.

संग्रहित फोटो: नितीन गडकरी

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपने ‘अच्छे दिन’ या घोषणेचा हत्त्यार म्हणून वापर केला. या हत्याराच्या धारेच्या जोरावर भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पाणीपत करुन चक्क बहुमतात सरकार स्थापन केले. भाजप सरकार सत्तेवर येऊन आता दोन वर्ष उलटल्यानंतर ‘अच्छे दिन’ची संकल्पना नक्की भाजपकडे कोठून मिळाली याचे गुपित मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उघड केले. बहुमतात सत्ता स्थापन करण्यात महत्वाची ठरलेली ‘अच्छे दिन’ ही संकल्पना आता आमच्यासाठी त्रासदायक ठरत असल्याचे सांगत त्यांनी ही संकल्पना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामुळे सूचल्याचे सांगितले.

माजी पंतप्रधान  मनमोहन सिंग यांना एका कार्यक्रमामध्ये  देशाचे ‘अच्छे दिन’ कधी येणार? असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी अच्छे दिन येण्यासाठी आणखी वाट पहावी लागेल , असे सांगितले होते. मनमोहन सिंग यांच्या या वक्तव्यावर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले सरकार आल्यानंतर ‘अच्छे दिन’ येतील, असे आपल्याला  सांगितल्याची पुष्टी गडकरी यांनी जोडली.

आपल्या देश म्हणजे अतृप्त आत्मांचा महासागर असल्यामुळे ‘अच्छे दिन’ ही संकल्पना सत्यात उतरविणे अशक्य असल्याचे ते म्हणाले.  यातून त्यांना माणसाच्या गरजा या नेहमी वाढतच राहतात, त्याला कधीच मिळालेल्या गोष्टीपासून समाधान मिळत नाही. असे सूचित करायचे होते. सायकल असणाऱ्याला स्कूटर हवी असते, तर स्कूटरवाल्याला चारचाकीचे स्वप्न असते, असे उदाहरण देखील त्यांनी दिले. हे विधान करण्यापूर्वी  प्रसारमाध्यमांनी माझ्या या वाक्याचा विपर्यास करु नये, हे सांगायलाही ते  विसरले नाहीत.

मुंबईतील एका औद्योगिक कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी आमच्या सरकारच्या काळात ४ टक्के अपघाताचे प्रमाण वाढल्याची कबूली दिली. विशेष म्हणजे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रीपद हे गडकरी यांच्याकडेच आहे. त्यामुळे  भविष्यात अपघाताचे प्रमाण  कमी करण्यावर भर दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी  दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 11:15 pm

Web Title: achche din are never expected says nitin gadkari
Next Stories
1 पाकिस्तानात पोलिसाने हिंदू मुलीला अपहरणकर्त्यांपासून वाचवले आणि ५० हजारात विकले
2 प्रवाशाच्या एका ट्विटमुळे रेल्वेच्या टीटीवर काही तासांत निलंबनाची कारवाई
3 भाजपला शह देण्यासाठी गोव्यात महायुतीची मोर्चेबांधणी
Just Now!
X