21 September 2020

News Flash

बँक कर्मचाऱ्यांचा संप, पाच दिवस बँका बंद

बँकेची जर काही महत्त्वाची कामं असतील तर ती 20 तारखेच्या आधीच करुन घ्या

संग्रहित छायाचित्र

बँकेची जर काही महत्त्वाची कामं असतील तर ती 20 तारखेच्या आधीच करुन घ्या, जर 20 तारखेपर्यंत बँकेची कामं केली नाहीत तर तुम्हाला बरेच दिवस वाट पाहावी लागेल. कारण 20 तारखेनंतर 5 दिवस बँका बंद असणार आहेत. 21 ते 26 डिसेंबरदरम्यान 5 दिवस बँका बंद असतील.

21 डिसेंबर रोजी बँक कर्मचाऱ्यांबाबत केंद्राच्या नीती विरोधात ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने (AIBOC) संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. वेतनवाढ आणि बँक ऑफ बडोदा, देना बँक व विजया बँक यांच्या विलयाच्या निर्णयाला विरोध यासाठी बँकांकडून संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. त्यामुळे 21 डिसेंबर रोजी संप, 22 आणि 23 डिसेंबर रोजी चौथा शनिवार आणि रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. सोमवारी म्हणजे 24 डिसेंबर रोजी बँका उघडतील पण मोठ्या गर्दीचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. त्यानंतर 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसनिमित्त सुट्टी आणि 26 डिसेंबर रोजी युनायटेड फोरमने पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

 बँका बंद असल्याने एटीएममध्ये देखील गर्दीचा सामना करावा लागू शकतो. बँकांना सुट्टी असली तरी एटीएमध्ये पैसे टाकण्याचं काम सुरु असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 10:03 am

Web Title: across india banks to be closed for 5 days
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 CCTV : पोलीस ठाण्यातच महिला कॉन्स्टेबलचा बळजबरी किस
3 राम मंदिर कधी बांधणार ? ; भाजपा खासदारांनी विचारला सरकारला जाब
Just Now!
X