News Flash

उत्तर प्रदेशच्या अप्पर मुख्य सचिवांनी घेतली ‘त्या’ कुटुंबाची भेट; म्हणाले…

डीजीपी हितेशचंद्र अवस्थी हे देखील होते सोबत.

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी हे पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यास निघालेले आहेत. तर, या अगोदर उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अवनीश अवस्थी व डीजीपी हितेशचंद्र अवस्थी यांनी या कुटुंबाची भेट घेतली. दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन अवस्थी यांनी या घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांना दिले आहे.

या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अवस्थी म्हणाले, “आम्ही पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि या घटनेतील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असे त्यांना आश्वासन दिले. एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे. कुटुंबीयांचे जवाब देखील नोंदवून घेण्यात आलेले आहे.”

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्यासह पाच जणांना हाथरसला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांना करोनाशी संबंधित सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्यासही सांगण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 4:57 pm

Web Title: acs home avnish awasthi and dgp hc awasthy meet the family of the alleged gangrape victim msr 87
Next Stories
1 राहुल गांधी, प्रियंका गांधींसह पाच जणांना हाथरसला जाण्याची परवानगी
2 …तर आम्ही पुन्हा प्रयत्न करू – प्रियंका गांधी
3 ‘शौर्य’ क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाचणी; ८०० किमीवरील शत्रूला भेदण्याची क्षमता
Just Now!
X