बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकिस्तानव्याप्त काश्मीरसोबत तुलना वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या वादातानंतर कंगनाच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगपालिकेडून कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर भाजप नेत्यांनीदेखील कंगनाला पाठिंबा दिला.

या वादात खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी कंगनाचे समर्थन करत महाराष्ट्र सरकावर आणि मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेस पक्षाच्या इशाऱ्यावर कंगाना विरोधात कारवाई केली जात आहे असे असे त्या म्हणाल्या. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना यावर भाष्य केलं.

आणखी वाचा- कंगना रणौतच्या आईची शिवसेनेवर टीका, ‘पळपुटे’ उल्लेख करत म्हणाल्या…

” पोलीस आयुक्त परमबीर सिंह कोणालाही न्याय मिळवून देऊ शकत नाही आणि जर कोणी त्याच्यावर आरोप केले असतील तर ते खरे आहेत. त्यांनी माझ्यावरही अन्याय केला आहे” असे ठाकूर यांनी सांगितले.

आता शिवसेना काँग्रेस पक्षाबरोबर आहे आणि कदाचित त्याच्यामुळे काँग्रेसचा प्रभाव त्यांच्यावर आहे. म्हणून काँग्रेसने शिवसेनेला त्यांच्या प्रभावखाली काम करण्यास भाग पाडले असल्याचे प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या. त्यांच्यामते महाराष्ट्रातील गृहखाते हे काँग्रेस पक्षाकडे आहे त्यामुळे कंगना विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

आणखी वाचा- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत शेअर करत कंगना म्हणाली…

दरम्यान, ठाकूर यांनी शिवसेनेविषयी सौम्य भूमिका मांडली. २००८ मध्ये अडचणीत असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय कोणताही पक्ष माझ्या पाठीशी नव्हता असेही त्या म्हणाल्या. बाळासाहेब ठाकरेंनी मालेगाव मालेगाव स्फोटातील ठाकूर यांच्यासह इतर आरोपींचे समर्थन केले होते.

आणखी वाचा- ‘एका स्त्रीचा शाप महागात पडतो’; अशोक पंडितांचा संजय राऊतांना टोला

याआधी उमा भारती यांनी देखील कंगनाला पाठिंबा दिला होता. कंगनावर केलेली कारवाई ही चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. महानगरपालिकेने राज्य सरकारच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आली असे त्या म्हणाल्या.