25 February 2021

News Flash

इराणच्या धमकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ‘साखरपेरणी’

'ज्यांचे हात सुलेमानी यांच्या रक्ताने माखले आहेत, त्यांना सोडणार नाही'

इराणने कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. ‘ज्यांचे हात सुलेमानी यांच्या रक्ताने माखले आहेत, त्यांना सोडणार नाही’ असे टि्वट इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी केले होते. इराणच्या आक्रमक भूमिकेमुळे संघर्ष अटळ दिसत आहे. इराण नेमके काय पाऊल उचलणार ? ते लवकरच समजले.

हा संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आता सामंजस्याची भाषा सुरु झाली आहे. शुक्रवारी पहाटे बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने चाललेल्या कासिम सुलेमानीच्या ताफ्यावर अमेरिकेने एअर स्ट्राइक केला. त्यामध्ये कासिम सुलेमानीसह आठ जण ठार झाले.

युद्ध भडकणार? काय म्हणतात ट्रम्प?
कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूवरुन इराण आणि अमेरिकेमध्ये मोठया प्रमाणावर तणाव निर्माण झाला आहे. सुलेमानी यांच्या मृत्यूमुळे युद्ध भडकणार नाही असा दावा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. कालही ट्रम्प यांनी ‘इराण युद्धात जिंकत नाही, पण तहात हरतही नाही’ असे सूचक टि्वट केले होते. त्यांनी अप्रत्यक्षपणे इराण बरोबर चर्चेची तयारी दाखवली होती. आताही ट्रम्प यांची तीच भूमिका आहे.

“युद्ध होऊ नये म्हणून आम्ही कारवाई केली. या एअर स्ट्राइकमागे युद्ध करण्याचा हेतू नव्हता. माझ्या मनात इराणी जनतेबद्दल प्रचंड आदर आहे. इराणच्या नागरिकांना मोठा सांस्कृतिक वारसा लाभला असून त्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. आम्हाला इराणमध्ये सत्तांतर घडवायचे नाही” असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. “इराणचे राज्यकर्ते या भागात आक्रमकता दाखवत शेजारच्या देशांमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हे तात्काळ थांबले पाहिजे” असे ट्रम्प यांनी सांगितले.

कासिम सुलेमानीचे काय आहे दिल्ली कनेक्शन?
कासिम सुलेमानीच्या मृत्यूने दहशतीच्या राजवटीचा शेवट झाला आहे. कासिम सुलेमानीने अनेक निरपराध लोकांची हत्या केली. नवी दिल्लीपासून ते लंडनपर्यंत दहशतवादी हल्ल्याचे कट रचण्यात त्याचा सहभाग होता असा आरोप ट्रम्प यांनी केला. सुलेमानीच्या अत्याचाराला बळी ठरलेल्या लोकांना आज न्याय मिळाला आहे. दहशतीचा शेवट झाला आहे असे ट्रम्प म्हणाले.

“मागच्या २० वर्षांपासून मध्य आशियामध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी सुलेमानी दहशतवादी कारवाया करत होता असा आरोप त्यांनी केला. अमेरिकेने काल जे केले ते आधीच करायला हवे होते. अनेकांचे प्राण वाचले असते. सुलेमानीने अमेरिकेच्या राजनैतिक आणि लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ल्याचे षडयंत्र रचले होते. पण त्याआधीच आम्ही त्याचा खात्मा केला” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.युद्ध टाळण्यासाठी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 1:02 pm

Web Title: action against qasem soleimani not to start war donald trump dmp 82
Next Stories
1 कासिम सुलेमानीच्या नवी दिल्ली कनेक्शनचा ट्रम्प यांनी केला उलगडा
2 भारताची खोडी काढताना फसले इम्रान खान; ट्रोल झाल्यानंतर करावं लागलं ट्विट डिलीट
3 दुसऱ्या दिवशीही अमेरिकेचा इराकवर एअरस्ट्राईक; ६ जणांचा मृत्यू
Just Now!
X