‘होंडा टू व्हीलर्स’ ही देशातली सगळ्यात मोठी टू व्हीलर उत्पादक कंपनी असून स्थापनेपासून कंपनीनं अत्यंत दर्जेदार व परवडणारी वाहनं दिली आहेत. वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनक्षमतेबरोबरच अत्याधुनिक व पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान उत्पादनांची वाढती मागणी पुरवण्यास सहाय्य करत आहे.

प्रत्येक मत #ActivIndia सोबत

भारतातला सगळ्यात विश्वासार्ह ब्रँड असलेल्या ‘होंडा मोटरसायकल व स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’नं #ActivIndia ही सगळ्यात मोठी सामाजिक चळवळ आणखी व्यापक केली आहे. देशभरातून २५ लाखांपेक्षा जास्त भारतीयांनी या चळवळीला हात दिला आहे. लोकशाही प्रक्रियेसाठी वाहतुकीची समस्या आव्हान ठरू शकते, ही समस्या कमी करणं हा मुख्य उद्देश आहे. या चळवळीच्या माध्यमातून समाजामध्ये चांगलं परीवर्तन होंडा आणत आहे.

निर्धार करा #KoiSeatNaJayeKhali

जेव्हा मतदानासाठी मतदार जातील तेव्हा कुठलीही सीट रिकामी राहणार नाही असं सांगताना होंडा प्रत्येक टू व्हीलर चालकाला आवाहन करत आहे की निर्धार करा #KoiSeatNaJayeKhali. कुठलीही सीट रिकामी राहणार नाही असं लक्ष्य ठेवताना भारताला #ActivIndia करण्याचा होंडाचा प्रयत्न आहे. मित्र, नातेवाईक, शेजारी यांच्यासोबत टू व्हीलरनं जा आणि प्रत्येक टू व्हीलरच्या माध्यमातून मतदान केंद्रात दोन मतं जातील याची खात्री करा. होंडा नेटवर्कच्या ६००० कामाच्या ठिकाणांच्या माध्यमातूनही या चळवळीसंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.

होंडाच्या सगळ्यात मोठ्या सामाजिक उपक्रमाबाबत बोलताना ‘होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.’चे सेल्स व मार्केटिंगचे ज्येष्ठ उपाध्यक्ष श्री. यदविंदर सिंग गुलेरिया यांनी सांगितले की, “होंडानं सकारात्मक सामाजिक बदलाची ठिणगी पेटवली आहे आणि या सामाजिक चळवळीमध्ये आत्ताच २५ लाखांपेक्षा जास्त भारतीयांनी सहभाग घेतला आहे. भारत झाला आहे #ActivIndia. आम्ही सगळ्या मतदारांना आवाहन करतो की मतदानासाठी जाताना मित्र, कुटुंबीय, नातेवाईक अशा सगळ्यांना सोबत न्या आणि #KoiSeatNaJayeKhali याची खात्री करा. आपण एकत्रितपणे सगळ्या मतदारांना सामाजिकदृष्ट्या सजग व जबाबदार करूया आणि बदल घडवू या. तुमचा पाठिंबा #ActivIndia या चळवळीला द्या आणि मतदानाचा निर्धार ९८७०५००१११ या क्रमांकावर ‘मिस्ड कॉल’ देऊन व्यक्त करा.

मतदान करण्याचा मुलभूत अधिकार बजावण्याची इच्छ असलेल्या प्रत्येकाला #ActivIndia एक अत्यंत प्रभावी असा संदेश देत आहे. #ActivIndia ही चळवळ विचारांची देवाणघेवाण करणारी सगळ्यात मोठ्या चळवळींपैकी एक ठरत आहे ही जी नागरिकांना पुरोगामी राष्ट्राचं अंग बनण्यासाठी प्रोत्साहित करते. #ActivIndia मतदारांना असं व्यासपीठ देते जे मतदानाचा निर्धार व्यक्त करते आणि मतदानाच्या दिवशी आठवणही करून देते.
#ActivIndia ही अॅक्टिव्हाची चळवळ आहे. पुढाकार घेणारे नागरिक पुरोगामी राष्ट्राची निर्मिती करतात.

मतदानाचा निर्धार करा:

‘प्लेजोमीटर’ किती जणांनी मतदानाचा निर्धार केला आहे याची लाइव्ह मोजदाद करतं आणि हे कसं काम करतं हे बघायचं असेल तर आमच्या http://www.hondaactivindia.com या वेबसाईटला आत्ताच भेट द्या आणि चळवळीत सामील व्हा.

एसएमएस रिमाइंडर सेट करा:

हे व्यासपीठ तुमच्या व्यस्त दिनक्रमाचाही विचार करतं आणि एसएमएस रिमाइंडर पाठवण्याचीही सोय करतं. तुम्ही वेबसाईटवर तुमचा मतदानाचा दिवस निवडा, तुम्हाला मतदानाच्या एक दिवस आधी आठवण करून दिली जाईल.

‘मिस्ड कॉल’च्या माध्यमातून चळवळीत सहभागी व्हा: तुमचे पाच सेकंद फरक घडवू शकतात. ९८७०५००१११ या क्रमांकावर ‘मिस्ड कॉल’ द्या आणि मतदानाचा निर्धार करून #ActivIndia या चळवळीला पाठिंबा द्या.

निर्धार निश्चित करा: तुम्हाला प्रत्येकाला हे दाखवण्याची संधी आहे की तुम्ही राष्ट्रासाठी तुमचं कर्तव्य पार पाडत आहात. तुमच्या निर्धाराची माहिती सगळ्यांना सांगा.

कार्याचा प्रसार करा: तुमची मित्रमंडळी व कुटुंबीयांना मतदानाच्या प्रक्रियेचा हिस्सा होण्यासाठी सहाय्य करा. तुमच्या निर्धाराचं प्रमाणपत्र सोशल मीडियावर अपलोड करा आणि तुमच्या मित्रमंडळींना व कुटुंबीयांनाही सहभागी होण्याचं आवाहन करा.

दर्जेदार उत्पादनं परवडणाऱ्या किमतीत देण्याबरोबरच आणखी जास्त काही देण्यावर होंडाचा मनापासून विश्वास आहे. जबाबदारीनं दीर्घकालीन उत्पादनांच्या निर्मिती करण्याच्या सामाजिक दायित्व असलेल्या अनेक उपक्रमांखेरीज होंडा हा ब्रँड पुरोगामी राष्ट्रनिर्मितीसाठीही हातभार लावतो. #ActivIndia चळवळ ही सगळ्या ब्रँडसाठी नक्कीच एक आदर्श आखून देत आहे.

(हा स्पॉन्सर केलेला लेख आहे)