14 August 2020

News Flash

अभिनेत्री दिव्या चौकसेचा कर्करोगामुळे मृत्यू

तिच्या चुलत बहिणीने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दिव्या चौकसेचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ती कर्करोगीशी झुंज देत होती. अखरे १२ जुलै रोजी तिची कर्करोगासोबतची झुंज संपली.

दिव्याच्या निधनाची माहिती तिच्या चुलत बहिणीने फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. ‘मला तुम्हाला सांगताना दु:ख होत आहे की, माझी चुलत बहिण दिव्या चौकसेचा कर्करोगामुळे मृत्यू झाला आहे. तिने १२ जुलै रोजी जगाचा निरोप घेतला. तिने लंडनला जाऊन अभिनयाचे धडे घेतले होते. ती एक चांगली मॉडेल होती. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच मालिकांमध्येही काम केले आहे’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले. दिव्याने निधनापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती.

दिव्याने २०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हे अपना दिल तो आवारा’ या चित्रपटात काम केले होते. दिग्दर्शक मंजोय मुखर्जीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दीड वर्षांपासून दिव्या कर्करोगीशी झुंज देत होती. भोपाळ येथे तिचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 8:42 am

Web Title: actor divvya chouksey passes away avb 95
Next Stories
1 राजस्थानमध्ये वेगवान घडामोडी, मध्यरात्री २.३० वाजता काँग्रेसची पत्रकार परिषद; १०९ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा
2  ‘यूजीसी’च्या सूचना बंधनकारक
3 चाचणी नकारात्मक, तरी तातडीने उपचार करा
Just Now!
X