News Flash

‘ओम फट् स्वाहा’चा दरारा निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं निधन

ते ८३ वर्षांचे होते.

झपाटलेला चित्रपटात ‘बाबा चमत्कार’ ही भूमिका साकारणारे अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

राघवेंद्र यांनी मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केले होते. त्यांनी अश्रूंची झाली फुले नाटकात धर्माप्पा ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका त्यावेळी विशेष गाजली होती. त्यांनी ‘ब्लक अँड व्हाईट’, ‘गौरी’, ‘सखी’, ‘कुठे शोधू मी तिला’ या मराठी चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर ‘छोडो कल की बात’ या हिंदी चित्रपटात देखील त्यांनी भूमिका साकारली होती. बालगंधर्व परिवारतर्फे राघवेंद्र यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

राघवेंद्र यांनी कृष्णधवल चित्रपटांपासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी रंगभूमीवर काशीनाथ घाणेकर, शरद तळवळकर अशा दिग्गज कलावंतांसोबत काम केले. ‘झपाटलेला’ या चित्रपटातील त्यांची बाबा चमत्कार ही भूमिका विशेष गाजली होती. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि दिलीप प्रभावळकर यांनी भूमिका साकारल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 7:39 pm

Web Title: actor raghvendra kadkol passes away avb 95
Next Stories
1 “मोदींनी अमेरिकन संसदेवरील हल्ल्यासंदर्भात भाष्य का केलं?, भारत सरकार नेपाळ, श्रीलंकेच्या अंतर्गत विषयांवर का बोलतं?”
2 FIR दाखल झाल्याच्या त्या बातमीनंतर ग्रेटा थनबर्ग म्हणाली….
3 लोकशाहीविरोधी वागणाऱ्या कुठल्याही शक्तीला जनतेनं सोडलं नाही, त्यांना धडा शिकवला – शरद पवार
Just Now!
X