बॉलिवूड अभिनेता रतन चोप्रा यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ते कर्करोगाना त्रस्त होते. अखेर पंजाबमधील मलेर कोटला येथे राहत्या घरी त्यांचं निधन झालं. ‘मोम की गुडियाँ’ या चित्रपटामधून ते घराघरात पोहोचले होते. रतन चोप्रा यांच्या मुलीने त्यांच्या निधनाची माहिती दिली. आर्थिक चणचण असल्यामुळे त्यांच्यावर योग्य ते उपचार करता न आल्याचं सांगण्यात येत आहे.

‘इंडिया टुडे’नुसार  रतन चोप्रा यांना जानेवारी २०२० मध्ये कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांनी काही बॉलिवूड कलाकारांकडे आर्थिक मदतही मागितली होती. मात्र त्यांना मदत मिळाली नाही. यातच उपचाराअभावी त्यांचं निधन झालं.

drishyam-hollywood-remake
‘दृश्यम’बद्दल मोठी अपडेट समोर; कोरीअन रिमेकनंतर आता चित्रपटाचा बनणार आता हॉलिवूडमध्ये रिमेक
marathi actress Amruta Subhash and sandesh kulkarni Love story Entdc
पहिल्या भेटीतलं प्रेम, १७व्या वर्षी लग्नाची मागणी अन् मूल होऊ न देण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची फिल्मी लव्हस्टोरी
actor shreyas talpade debut in south indian movie
बॉलीवूड गाजवल्यानंतर आता मराठमोळा श्रेयस तळपदे करणार दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण, म्हणाला…
aamir-khan2
ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा

दरम्यान,रतन चोप्रा यांनी लग्न केलं नव्हतं. मात्र त्यांनी अनिता या मुलीला दत्तक घेतलं होतं. त्यामुळे त्यांच्या पश्चात केवळ अनिताच आहे. रतन चोप्रा यांनी १९७२ मध्ये ‘मोम की गुडियाँ’ या चित्रपटात काम केल्यानंतर त्यांच्याकडे अनेक चित्रपटांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ते त्याकाळी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता होते.