जोधपूर : काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान याला पाच वर्षांच्या कारावसाची शिक्षा ठोठावण्यात आली असून त्याविरुद्ध त्याने केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान त्याला न्यायालयात अनुपस्थित राहण्याची सवलत मंगळवारी न्यायालयाने दिली. मुंबई आणि जोधपूरमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असल्याने सुनावणीसाठी प्रवास करणे सलमान खान याच्यासाठी जोखमीचे ठरू शकते, असे त्याच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायमूर्ती ब्रजेश पानवर यांनी खान याला न्यायालयात अनुपस्थित राहण्याची सवलत दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ जानेवारी रोजी होणार आहे. मुंबई आणि जोधपूरमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने सुनावणीसाठी खान याला प्रवास करावा लागणे जोखमीचे ठरू शकते असे आम्ही न्यायालयास सांगितल्याचे खान याचे वकील एच. एम. सारस्वत यांनी सांगितले.