News Flash

‘कंगनाला Y+ सुरक्षा माझ्या करातून मिळणार का?’; अभिनेत्रीचा संतप्त सवाल

कुबरा सैतने व्यक्त केली नाराजी

मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला मोदी सरकारकडून Y+ श्रेणीतील सुरक्षा देण्यात आली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली असून बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील त्यांची मत मांडली आहेत. यामध्येच अभिनेत्री कुबरा सैत हिने नाराजी व्यक्त करत ‘कंगनाला Y+ सुरक्षा माझ्या करातून मिळणार का?’,असा प्रश्न विचारला आहे. तिच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या नजरा तिच्याकडे वेधल्या आहेत.

कुबराने ट्विटरवर कंगनाला मिळणाऱ्या Y+ श्रेणीतील सुरक्षासंदर्भातील एक बातमी शेअर केली असून त्यावर, “मी फक्त खात्री करण्याचा प्रयत्न करते. ही सुरक्षा मी भरत असलेल्या करातून देण्यात येत आहे”, असं म्हटलं आहे. तिच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. तिचं ट्विट सगळीकडे चर्चिलं जात आहे. सोबतच अनेकांन त्यावर कमेंट्सदेखील केल्या आहेत.

वाचा :कंगना रणौतला मोदी सरकार पुरवणार Y+ श्रेणीतील सुरक्षा

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सातत्याने व्यक्त होणाऱ्या कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीसांवर प्रश्न उपस्थित केला होता. इतकंच नाही तर तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. तिच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी तिच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही तिला खडेबोल सुनावले आहेत. यात ९ सप्टेंबर रोजी कंगना मुंबईत येणार असल्यामुळे तिला Y+ श्रेणीतील सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. या सुरक्षेमध्ये १० सशस्त्र कमांडो तैनात असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 10:21 am

Web Title: actress kubra sait tweet on crpf commando security provide to kangana ranaut ssj 93
Next Stories
1 Coronavirus : काहीसा दिलासा! रुग्णवाढीत घसरण पण, मृतांची संख्या चिंताजनक
2 लॉकडाउननंतर तिरुपती मंदिरात भाविकांकडून पहिल्यांदाच एका दिवसात तब्बल ‘इतकं’ दान !
3 मोदींनी परराष्ट्र मंत्र्यांना दौरा रद्द करायला सांगावं; चीनप्रश्नी स्वामी यांचा पंतप्रधानांना सल्ला
Just Now!
X