News Flash

अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचं वयाच्या २७ व्या वर्षी निधन

किडनीच्या आजाराने मिष्टी होती त्रस्त, शुक्रवारी रात्री घेतला अखेरचा श्वास

अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचं किडनीच्या आजाराने निधन झालं. ती २७ वर्षांची होती. शुक्रवारी रात्री तिचं निधन झालं गेल्या काही दिवसांपासून ती रुग्णालयात उपचार घेत होती. मात्र तिची प्राणज्योत शुक्रवारी रात्री उशिरा मालवली. शनिवारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

२०१२ पासून मिष्टी मुखर्जीने तिच्या करिअरला सुरुवात केली होती. लाइफ की तो लग गयी हा तिचा पहिला सिनेमा होता. त्यानंतर ती काही सिनेमांमध्ये झळकली मात्र बिग बजेट सिनेमा तिला मिळाला नव्हता. २०१४ मध्ये मिष्टी मुखर्जीवर सेक्स रॅकेट चालवल्याचाही आरोप झाला होता त्यावेळी तिच्या नावाची बरीच चर्चा झाली होती. तिच्या घरी धाड टाकण्यात आली त्यावेळी पोलिसांनी अनेक सीडीज आणि टेप्स सापडले होते. मिष्टी मुखर्जीच्या कुटुंबीयांवरही हे आरोप झाले होते.

दरम्यान बंगळुरु या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात मिष्टीवर उपचार सुरु होते. मिष्टी मुखर्जीने हिंदीसह बंगाली सिनेमांमध्येही काम केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून किडनीचा त्रास जाणवू लागल्याने ती किटो डाएटवर होती. मिष्टीच्या मागे तिचे आई वडील आणि तिचा एक भाऊ असे कुटुंब आहे. बोल्ड म्युझिक आणि आयटम साँग्ससाठी मिष्टी मुखर्जी प्रसिद्ध होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 8:20 am

Web Title: actress mishti mukherjee dies of kidney failure in bengaluru scj 81
Next Stories
1 ‘आधीच्या सरकारांनी कृषी सुधारणांचे धाडस दाखवले नाही’
2 काँग्रेसच्या काळात संरक्षणाकडे दुर्लक्ष
3 अतिउंचावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा!
Just Now!
X