News Flash

खासदार नुसरत जहाँच्या रिसेप्शन पार्टीला दिग्गजांची उपस्थिती

सोशल मीडियाने सर्वांत सुंदर खासदार असा किताब दिलेल्या नुसरत यांनी टर्कीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं.

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री व नवनिर्वाचित खासदार नुसरत जहाँ यांनी लग्नानंतर गुरुवारी कोलकातामध्ये रिसेप्शनचं आयोजन केलं. कोलकात्याचे व्यावसायिक निखिल जैन यांच्यासोबत त्यांनी टर्कीमध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर मित्र-परिवारासाठी त्यांनी कोलकातामध्ये रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं. या कार्यक्रमाला राजकीय नेते व सिनेसृष्टीतील कलाकारसुद्धा उपस्थित होते.

कोलकातामधल्या आयटीसी रॉयल इथं हा शाही कार्यक्रम पार पडला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीसुद्धा कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी नुसरतची खास मैत्रीण व खासदार मिमी चक्रवर्ती आवर्जून उपस्थित होती.

सोशल मीडियाने सर्वांत सुंदर खासदार असा किताब दिलेल्या नुसरत यांनी टर्कीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं. खासदार झाल्यानंतर नुसरत यांनी लग्नाची घोषणा केली होती. लग्नासाठी त्यांनी शपथविधी सोहळा चुकवला होता. नुसरत व निखिल यांची भेट गतवर्षी दुर्गा पूजेदरम्यान झाली. यानंतर दोघांत मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 12:29 pm

Web Title: actress mp nusrat jahan wedding reception mamata banerjee arrive at function ssv 92
Next Stories
1 Budget 2019: जे ५५ वर्षात झालं नाही ते आम्ही पाच वर्षात करुन दाखवलं – निर्मला सीतारामन
2 Budget 2019: निर्मला सीतारामन यांची बजेट ब्रीफकेसऐवजी लाल कापडाला पसंती
3 Budget 2019: भारतीय अर्थसंकल्पाबद्दल या १२ रंजक गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
Just Now!
X