मशिदीमध्ये गाण्याच्या व्हिडीओचं चित्रीकरण केल्यामुळे अभिनेत्री सबा कमरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यासोबत गायक बिलाल सईद याच्यावरदेखील लाहोर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर सबाच्या या म्युझिक व्हिडीओची क्लिप व्हायरल होत आहे.

दिवंगत अभिनेता इरफान खानच्या ‘इंग्लिश मीडियम’ या चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सबा कमर हिने काही दिवसांपूर्वी मशिदीमध्ये एका गाण्याच्या व्हिडीओचं चित्रीकरण केलं होतं. या गाण्यात निकाहचा सीन दाखविण्यात आला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी सबा आणि बिलाल यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.

 

View this post on Instagram

 

Presenting the first teaser of ‘Qubool’This is also the only sequence that was shot at the historical Wazir Khan Mosque. It’s a prologue to the music video featuring a Nikah scene. It was neither shot with any sort of playback music nor has it been edited to the music track. I won’t explain any further as the full video comes out on 11th of August. The BTS video that’s making rounds on social media was just a circular movement to click stills for the poster of ‘Qubool’ depicting a happily married couple right after their Nikah. Hurting or offending anyone or being disrespectful to a holy place is as unimaginable and unacceptable for me as for any decent human being. Despite this if we have unknowingly hurt anyone’s sentiments we apologise to you all with all our heart. Love & Peace! #Qubool releasing on 11th of August@bilalsaeed_music

A post shared by (@sabaqamarzaman) on

याप्रकरणी वकील फरहत मंजूर खान यांनी १३ ऑगस्ट रोजी पाकिस्तान पीनल कोडच्या (पीपीसी) कलम २९५अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा सबासह बिलाल आणि म्युझिक व्हिडीओविरोधात असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणी सबाने सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेची माफी मागितली आहे. “कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. परंतु. जर कोणाला त्रास झाला असेल तर त्याप्रकरणी मनापासून माफी मागते” असं सबा म्हणाली. सबाच्या या म्युझिक व्हिडीओचं नाव ‘कुबूल है’ असं असून तो ११ ऑगस्ट रोजी रिलीज झाला आहे.