18 January 2021

News Flash

अखेर कष्टाचं चीज झालं; अदर पुनावाला यांनी ट्विट करून व्यक्त केला आनंद

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार

संग्रहित छायाचित्र/अदर पुनावाल ट्विटर हॅण्डल

लसीची अखेर प्रतीक्षा संपली. करोनाविरोधात लढण्यासाठी प्रभावी शस्त्र असलेली लस आता भारतातही लवकरच उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने रविवारी सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन औषध निर्माण कंपन्यांच्या लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. त्यांची घोषणा ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था) आज केली. कोविशिल्ड लसीला मंजुरी देण्यात आल्यानंतर सीरम इन्सिस्ट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला.

प्रसार रोखण्याबरोबरच करोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकारनं लसीकरणाच्या कार्यक्रमावर जोर देण्यास सुरूवात केली आहे. त्यातच रविवारी सीरम इन्सिस्ट्यूटच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था) याची घोषणा केली. त्यामुळे आपत्कालीन वापरासाठीचा लसींचा मार्ग मोकळा झाला आहे. या घोषणेनंतर सीरमचे सीईओ अदर पुनावाल यांनीही आनंद व्यक्त केला.

कोविशिल्डला परवानगी देण्यात आल्यानंतर पुनावाला यांनी ट्विट केलं. “सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. लस संकलनासाठी सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाने पत्करलेल्या सर्व अडचणींचं अखेर यश मिळालं. करोनावरील भारताच्या पहिली लस असलेल्या कोविशिल्डला मंजुरी मिळाली आहे. ही लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे आणि पुढील काही आठवड्यात लोकांना देण्यासाठी तयार आहे,” असं सांगत पुनावाला यांनी आपल्या आनंदी भावना व्यक्त केल्या.

त्याचबरोबर पुनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, बिल गेट्स, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर, बायो टेक्नॉलॉजी विभाग, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, ऑक्सफर्ड विद्यापीठ, अॅस्ट्राझेनेका यांच्यासह संबंधित संस्थांचे आभार मानले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2021 12:24 pm

Web Title: adar poonawala twitter reaction on coronavirus vaccine approval says all risks paid off bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 अखिलेश यादव यांचा बदलला सूर!; आता म्हणतात लसीकरणाची तारीख लवकर घोषित व्हावी
2 मोठी बातमी! कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींना तातडीच्या वापराची संमती
3 Coronavirus – देशात मागील २४ तासांत २० हजार ९२३ जण करोनामुक्त, २१७ रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X