News Flash

सप्टेंबरपर्यंत दुसरी कोविड लस सुरू करण्याची आशा अदर पूनावाला यांनी केली व्यक्त

कोव्होवॅक्स या दुसर्‍या लसीची चाचणी भारतात सुरू झाली आहे

(संग्रहित छायाचित्र)

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी शनिवारी सांगितले की, त्यांची कंपनी यावर्षी सप्टेंबरपर्यंत कोविड -१९ प्रतिबंधक दुसरी लस बाजारात आणण्याची शक्यता आहे. सीरम आणि अमेरिकी वॅक्सिन डेव्हलपमेंट कंपनी नोव्हावाक्स यांनी बनवलेल्या कोव्होवॅक्स या दुसर्‍या लसीची चाचणी भारतात सुरू झाली आहे.

कोव्होवॅक्सची आफ्रिकन आणि ब्रिटनच्या कोविड -१९ विषाणुच्या प्रकारांविरुद्ध चाचणी घेण्यात आली असून त्याची एकूण कार्यक्षमता ८९ टक्के आहे, असे पूनावाला यांनी ट्वीट केले आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. ही कंपंनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेली कोझिशिल्डची पहिली लस भारत आणि इतर अनेक देशांना पुरवठा करीत आहे. लसींचा तुटवडा होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे कंपनीने सांगितले आहे. भारतातील लसीकरण मोहीम अगदी योग्य प्रकारे सुरू असताना कंपनी आपल्या दुसर्‍या लसीच्या प्रकल्पाकडे वाटचाल करत आहे. गुरुवारी पुण्यातील रुग्णालयात याच्या चाचण्या देखील सुरू झाल्या आहेत.

वृत्तानुसार, यूकेमध्ये झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये कोव्होवॅक्सने करोना मूळ विषाणुच्या विरूध्द ९६ टक्के कार्यक्षमता दर्शविली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 2:49 pm

Web Title: adar poonawalla hopes to launch 2nd covid vaccine by september sbi 84
Next Stories
1 मानवी लिंगाचा आकार प्रदुषणामुळे होतोय लहान; संशोधकांचा दावा
2 डॅनियल पर्ल प्रकरणातील मुख्य आरोपींंना दोषी सिद्ध करण्यात फिर्यादी पक्ष अपयशी, पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाची टीका
3 टीएमसीची निवणूक आयोगाला मतदानाच्या प्रक्रियेत लक्ष घालण्याची विनंती
Just Now!
X