राज्यातील गाजलेल्या आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना क्लिन चीट दिली. राज्याचे मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी या इमारतीच्या मंजुरी संदर्भात आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नसल्याचे सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. 
आदर्श सोसायटीमध्ये शिंदे यांची बेनामी सदनिका असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्ते प्रविण वाटेगावकर यांनी शिंदे यांना याप्रकरणी आरोपी करण्याची मागणी केली होती. त्यावर सीबीआयने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आणि शिंदे यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नसल्याने त्यांना क्लिन चीट दिली. याप्रकरणी सुरू असलेल्या तपासात शिंदे यांना आरोपी करण्याची कायदेशीरदृष्ट्या कोणतीही गरज नसल्याचे सीबीआयला वाटते, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.