05 July 2020

News Flash

धोक्याचा इशारा : देशाचा विकासदर येईल ४ टक्क्यांवर

करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागितक आरोग्य आणीबाणीचा भारताला आर्थिक आघाडीवर मोठा फटका बसण्याचे संकेत आहेत.

करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागितक आरोग्य आणीबाणीचा भारताला आर्थिक आघाडीवर मोठा फटका बसण्याचे संकेत आहेत. आशियाई विकास बँकेने २०२०-२१ या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर चार टक्क्यापर्यंत घसरण्याचे भाकीत वर्तवले आहे.

देशात आधीपासूनच मंदीसदृश्य स्थिती असताना आता करोना व्हायसरच्या संकटामुळे त्यात आणखी भर पडली आहे. आपण आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत आहोत. करोना व्हायरसमुळे लोकांच आयुष्य विस्कळीत झालं आहे. जगभरातील व्यवसाय, व्यापाराला फटका बसला आहे असे आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष म्हणाले.

COVID-19 भारतात मोठया प्रमाणावर पसरलेला नाही. भारतात COVID-19 चा फैलाव झालेला नाही असेही ते यावेळी म्हणाले. २०२०-२१ मध्ये भारतात जीडीपी चार टक्क्यांपर्यंत घसरेल असे आशियाई विकास बँकेचे भाकीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 2:22 pm

Web Title: adb expects indias economic growth to slow down to 4 in fy21 on global pandemic dmp 82
टॅग Coronavirus
Next Stories
1 पंतप्रधान मोदींचे भाषण आणि ‘९’ अंकाचं कनेक्शन
2 “नमाजच्या नावाखाली सोशल डिस्टन्सिंग न पाळणं हराम”, जमात-उलेमा-ए-हिंदच्या प्रमुखांचं मोठं वक्तव्य
3 Coronavirus : जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनची ‘कोविड-19’साठी लीड व्हॅक्सिन कँडिडेटची घोषणा
Just Now!
X