येमेनमधील शिया बंडखोरांनी अध्यक्ष अब्द्राबु मन्सूर हदी यांच्या प्रासादावर कब्जा केल्याचा निषेध म्हणून आणि हदी यांच्या समर्थनार्थ एडनमधील अधिकाऱ्यांनी बुधवारी एडन विमानतळ बंद केला.
हुथी म्हणून ओळखले जाणारे हे शिया बंडखोर अब्दुल मलिक अल-हुथी याच्या नेतृत्वाखाली येमेनच्या घटनेच्या मसुद्यातील बदलांना विरोध करत आहेत. त्यासाठी मंगळवारी त्यांनी राजप्रासादावर हल्ला चढवत संरक्षणदल प्रमुख अहमद आवाद बिन मुबारक यांचे अपहरण केले. तर सोमवारी त्यांनी पंतप्रधान खालीद बहाह यांच्या निवासस्थानाला वेढा घातला होता.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनेही या हल्ल्यांचा निषेध केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2015 12:53 pm