खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एडचीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांनी स्वत:चे ९५ टक्के शेअर्स (समभाग) मागील आठवड्यामध्ये विकले आहेत. यामधून आदित्य पुरी यांना ८४३ कोटी रुपये मिळाले आहेत. आदित्य पुरी यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या एचडीएफसीचे ७४.२ लाख शेअर्सची विक्री केली आहे. ही विक्री त्यांनी २१ जुले ते २४ जुलै या चार दिवसांच्या कालावधीमध्ये केल्याचे इकनॉमिक टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. पुरी यांच्याकडे एचडीएफसीचे ७७.९६ लाख शेअर्स होते. पुरी यांना आर्थिक वर्ष २०२० साठी ६.८२ लाख ईएसओपीच्या माध्यमातून मिळाले आहेत. २४ मार्च रोजी बँकेचे शेअर्स सर्वात खालच्या स्तरापर्यंत पडल्याचे दिसून आले. ७६५ रुपयांपर्यंत एचडीएफसीचे शेअर्स पडले होते. मात्र त्यानंतर या शेअर्सची किंमत ४६ टक्क्यांनी वधारल्याचे पहायला मिळालं आहे.

नक्की पाहा >> देशातील अव्वल बँकांच्या CEOs च्या पगाराचे आकडे पाहून थक्क व्हाल

आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये सर्वाधिक पगार घेणाऱ्या देशातील अव्वल बँकांच्या एमडी आणि सीईओंच्या यादीत पुरी अव्वल स्थानी आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात पुरी यांना पगार आणि संचालक म्हणून देण्यात येणाऱ्या इतर निधीमध्ये एकूण ३८ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे २०१९-२० या आर्थिक वर्षात पुरी यांना १८ कोटी ९२ लाख रुपये पगार मिळाला आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये स्टॉक ऑप्शन्सचा फयादा घेत त्यांनी ४२ हजार २० कोटी रुपये कमवले होते. १९९४ पासून बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे आदित्य पुरी या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये निवृत्त होणार आहोत. २० ऑक्टोबर रोजी पुरी निवृत्त होत असल्याने त्यानंतर बँकेचे नेतृत्व कोणाच्या हाथी द्यायचे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे.

बँकेच्या अहवालानुसार एचडीएफसीचे ग्रुप हेड सशिधर जगदीशन यांना २०१९-२० मध्ये २.९१ कोटी रुपये पगार म्हणून देण्यात आला आहे. पुरी यांच्यानंतर जगदीशन यांच्याकडेच एचडीएफसीच्या संचालकपदाची सुत्रे जाणार असल्याची चर्चा सध्या बँकिंग वर्तुळामध्ये आहे. याच प्रमाणे पुरी यांची जागेसाठी सीटी बँकचे कायझाद बरुचा, सुनिल गर्ग यांची नावेही चर्चेत आहेत.