भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरुन ५९ चिनी अॅपवर सोमवारी बंदी घालण्यासंदर्भातील महत्वाची घोषणा केली. बंदी घालण्यात आलेल्या अॅपमध्ये टिकटॉक, शेअरइट, कॅमस्कॅन अशी सामान्यांच्या रोजच्या वापरातील अॅप्सही आहेत. त्यामुळेच आता बंदी घातल्यावर ही अॅप्स असणाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आता आम्ही काय करावे, बॅकअप घ्यावे का?, अॅप आपोआप डिलीट होणार का? आमच्या माहितीचं काय होणार असे असंख्य प्रश्न युझर्सला पडले आहेत. याच सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आज लोकसत्ताच्या डिजीटल अड्डावर येत आहेत सायबर कायदेतज्ज्ञ अ‍ॅडव्हकेट प्रशांत माळी.

लोकसत्ता डॉट कॉमच्या युट्यूब तसेच फेसबुक पेजवर तुम्हाला ही विशेष मुलाखत पाहता येईल