News Flash

अफगाणिस्तानात हवाई छाप्यांमध्ये ४० जण ठार झाल्याची शक्यता

तालिबानचे १४ दहशतवादी आणि ६ परदेशी लोक ठार झाल्याचे हेलमंदच्या गव्हर्नरांनी सांगितले.

(संग्रहित छायाचित्र)

कंदाहार : अफगाणिस्तानच्या विशेष फौजांनी दक्षिणेकडील हेलमंद प्रांतात तालिबानी दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर सोमवारी रात्री घातलेल्या छाप्यादरम्यान मुलांसह ४० नागरिक ठार झाल्याच्या वृत्ताची अफगाणिस्तानी अधिकारी खातरजमा करत आहेत.

मुसा कला जिल्ह्य़ात रात्रभरात झालेल्या या मृत्यूंबाबतच्या तपासाची माहिती सर्वाना दिली जाईल, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. काबूलच्या पूर्वेकडील नंगरहार प्रांतातील एका ड्रोनहल्ल्यात ९ नागरिक ठार झाल्यानंतर एका आठवडय़ाच्या आत ही घटना घडली आहे.

अफगाणिस्तानच्या विशेष फौजांनी घातलेल्या हवाई छाप्यांमध्ये तालिबानचे १४ दहशतवादी आणि ६ परदेशी लोक ठार झाल्याचे हेलमंदच्या गव्हर्नरांनी सांगितले. यात नागरिकांचे बळी गेल्याच्या या वृत्ताबाबत तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी एका निवेदनात सांगितले.

हेलमंदमधील रहिवासी आणि स्थानिक अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विवाह समारंभाचा भाग म्हणून सायंकाळी कार्यक्रम सुरू असताना सुरक्षा दलांनी संशयित दहशतवाद्यांविरुद्ध जमिनीवरून तसेच आकाशातून मोहीम सुरू केली. यात अफगाणी तसेच विदेशी फौजा सहभागी झाल्या होत्या, असे हेलमंद प्रांतिक परिषदेचे सदस्य मजीद अखुंदझादा यांनी सांगितले. यात सुमारे ४० लोक ठार झाले, तर १८ जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून, हे सर्व लोक नागरिक होते असे ते म्हणाले.

अफगाणिस्तानकडे परिपूर्ण हवाई दल नसून, बहुतांश हल्ले अमेरिकेच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या पाठिंब्याने केले जातात. अफगाणिस्तानातील संघर्षांत त्या देशाला हवाई मदत देणारा अमेरिका हा आंतरराष्ट्रीय आघाडीतील एकमेव देश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 3:36 am

Web Title: afghan forces kill up to 40 wedding guests during raid zws 70
Next Stories
1 कर्नाटकच्या अपात्र आमदारांच्या याचिकेवर सुनावणी होणार
2 पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी चर्चेची नव्हे कृतीची गरज : पंतप्रधान नरेंद्र मोदी
3 जम्मू-काश्मीर : हिज्बुल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांना अटक
Just Now!
X