News Flash

काबूलमध्ये भारतीयासह तीन विदेशी नागरिकांची हत्या

काबूलमधील लॉजिस्टिक कंपनीत काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचे गुरुवारी सकाळी अपहरण करण्यात आले. काही वेळाने तिघांचे मृतदेह काबूलजवळील मुसाही जिल्ह्यात सापडले.

प्रातिनिधिक छायाचित्र

अफगाणिस्तानमधील काबूल येथे तीन परदेशी नागरिकांची अज्ञात व्यक्तींनी अपहरण करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यात एका भारतीयाचा समावेश असून या हत्येमागे दहशतवाद्यांचा हात असावा, असा प्राथमिक संशय आहे.

काबूलमधील लॉजिस्टिक कंपनीत काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचे गुरुवारी सकाळी अपहरण करण्यात आले. काही वेळाने तिघांचे मृतदेह काबूलजवळील मुसाही जिल्ह्यात सापडले. बंदुकधारी मारेकऱ्यांनी त्यांचे अपहरण केले. या हत्याकांडामागे दहशतवादी संघटनांचा हात असावा, असा प्राथमिक संशय आहे. मात्र, अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

हत्या झालेल्यांमध्ये भारत, मलेशिया आणि मॅसेडोनिया या तीन देशांच्या नागरिकांचा समावेश असल्याचे स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी सांगितले. मात्र, त्या तिघांची नावे आणि अन्य तपशील अद्याप समजू शकलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 2:32 pm

Web Title: afghanistan 3 foreigners including indian working in kabul kidnapped and killed
Next Stories
1 मुस्लिम असल्यामुळे चार डॉक्टरांना घर सोडायला लावले
2 जमावाने मारहाण करीत मुस्लिम तरुणाला जबरदस्तीने दाढी काढायला भाग पाडले
3 नवज्योतसिंग सिद्धू जाणार इम्रान खान यांच्या शपधविधीला, राजकीय प्रवासाचे केले कौतूक
Just Now!
X