News Flash

अफगाणिस्तान : शाळेतील बॉम्बस्फोटातील मृत्युसंख्या ५०

शनिवारी झालेल्या हल्लय़ात जखमी झालेल्यांची संख्याही आता १०० झाली आहे

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलनजीक मुलींच्या शाळेत झालेल्या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांची संख्या पन्नास झाली असून यात ११ ते १५ वयाच्या विद्यार्थिनींचा समावेश आहे. शनिवारी झालेल्या हल्लय़ात जखमी झालेल्यांची संख्याही आता १०० झाली आहे ,असे अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे प्रवक्ते तारिक अरियन यांनी सांगितले.

शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर  तीन स्फोट झाले. त्या वेळी विद्यार्थिनी शाळेबाहेर पडत होत्या. काबूलच्या पश्चिमेला शियाबहुल भागात हे बॉम्बस्फोट झाले असून तालिबानने या हल्लय़ाची जबाबदारी न घेता हल्लय़ाचा निषेध केला आहे. पहिला स्फोट स्फोटके भरलेल्या वाहनाचा झाला, त्यानंतर दोन स्फोट झाले.  मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी हा हल्ला झाला होता त्यावर मोठय़ा प्रमाणात टीकाही झाली होती. अमेरिका व नाटो यांनी अफगाणिस्तानातून आणखी काही प्रमाणात माघार घेतल्यानंतर ही घटना झाली आहे. अफगाणिस्तानात वांशिक हाजरा गटाचे प्राबल्य आहे. पश्चिम दश्त ए बर्ची भागात अल्पसंख्याक शिया मुस्लिमांना हिंसाचारात लक्ष्य करण्यात आले. या भागातील हल्ले आयम्सिसनेच आतापर्यंत केले आहेत. पण शनिवारच्या बॉम्बस्फोटांची जबाबदारी त्यांनीही घेतलेली नाही.

मूलतत्त्ववादी सुन्नी गटाने  शियांविरोधात युद्ध पुकारले असून अमेरिकेने याचा दोष आयसिसला दिला आहे.  गेल्या वर्षी  प्रसूतिगृहावर झालेल्या हल्ल्यात बालकांसह गर्भवती महिला ठार झाल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 12:39 am

Web Title: afghanistan bomb attack near girl school kills at least 50 people zws 70
Next Stories
1 उत्तर प्रदेशात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर!; केंद्रीय मंत्र्याने केली कानउघाडणी
2 “डीआरडीओच्या नव्या औषधानं करोनारुग्ण लवकर बरे होणार”; वैज्ञानिकांनी व्यक्त केला विश्वास
3 “करोना मृत्यूंसाठी केंद्र सरकारचं जबाबदार”; मनीष सिसोदिया यांचा आरोप
Just Now!
X